

Police investigate the scene after a fatal tempo and motorcycle collision in Solapur.
Sakal
सोलापूर : येथील रुपाभवानी चौकातील वळणावर सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. मड्डी वस्तीकडून बलिदाना चौकाकडे जाण्यासाठी चौकात वळण घेताना मागून भरधाव आलेली दुचाकी टेम्पोखाली गेली. परिणामी, दुचाकीवरील तिघे तरुण जागीच ठार झाले. दुचाकी दूर अंतरावर पडली. पण, दुचाकीला काहीही झाली नाही आणि मृतदेह मात्र एकत्र ठेवल्यासारखे होते. त्यामुळे हा अपघात की घातपात, याबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.