
सोलापूर : पीएम सूर्यघर योजनेतून लोकांच्या घरांवर सौरऊर्जा पॅनेल बसवून देण्याचे काम करणाऱ्या तक्रारदाराकडून साहेबांसाठी आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कंत्राटी कर्मचारी योगिनाथ म्हेत्रे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. म्हेत्रे याने ‘महावितरण’चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरत व्हनमाने व सहाय्यक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी लाच स्वीकारल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.