esakal | माळशिरस तालुक्‍यातील तीन हजार परप्रांतीय निघाले गावी
sakal

बोलून बातमी शोधा

Three thousand other state people from Malshiras taluka went to the Own village

स्थलांतरीत लोकाना दिलेली सर्टिफिकेट 
तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची आकडेवारी : पिलीव - 145, माळीनगर - 241, मोरोची - 149, वेळापूर - 293, फोंडशिरस - 69, शंकरनगर - 180, पुरंदावडे - 104, मांडवे - 72, मानकी - 124, बोरगांव - 119, महाळुंग - 121, लवंग - 26, एकूण - 1643. 

माळशिरस तालुक्‍यातील तीन हजार परप्रांतीय निघाले गावी

sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) : माळशिरस तालुका हा सहकार क्षेत्रात अग्रगण्य तालुका आहे. तसेच नीरा उजवा कालवा, उजनीमुळे हरित क्रांतीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तरीही या तालुक्‍यात सुमारे तीन हजार परप्रांतीय मजूर असून या सर्वांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपापल्या गावी जाण्यासाठी आरोग्य विभागाकडे, महसूल खात्याकडे व पोलिस खात्याकडे विनंती अर्ज केले आहेत. 
नातेपुते येथे मोठ्या प्रमाणात लोखंडी फर्निचरचे कारखाने आहेत. तसेच माळशिरस, अकलूज येथेही गवंडीकाम, सुतारकाम व इतर काम करणारे अनेक कारागीर आहेत. या सर्वांची नोंदणी यापूर्वी कधीही करण्याचे कारण आलेले नव्हते. परंतु जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी कोरोना संसर्गामुळे सर्टिफिकेटची गरज आहे. त्यामुळे तालुक्‍यातील सर्व परप्रांतीयांनी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात आपली आरोग्य तपासणी करून सर्टिफिकेट घेतलेली आहेत. यामध्ये अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयांमधून 953, नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयातून 780 व माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयातून 434 अशी एकूण दोन हजार 167 आरोग्य तपासणी सर्टिफिकेट उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगणा, झारखंड आदी प्रांतांतील मजुरांनी घेतलेली आहेत. याशिवाय माळशिरस तालुक्‍यात प्राथमिक आरोग्य केंद्रामधून सुमारे एक हजार सर्टिफिकेट घेतली गेली आहेत. सुमारे तीन हजार मजूर तालुक्‍यातून आपापल्या गावी जाणार आहेत. 

स्थानिकांना मिळेल रोजगार 
माळशिरस तालुक्‍यातील सर्व मजूर आपल्या घराकडे गेल्यास भविष्यात मजुरांची कमतरता निर्माण होणार आहे. त्यामुळे स्थानिक मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. परंतु स्थानिक मजुरांनी परप्रांतीयांप्रमाणे वेळेत व कमी मजुरीत काम केले तरच या भागातील उद्योगधंदे चालणार आहेत. अन्यथा हे मजूर पुन्हा येईपर्यंत येथील लघुउद्योग बंद ठेवावे लागणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
 

loading image