
वैराग : बार्शी तालुक्यात ठाण मांडून बसलेला वाघ वैराग भागात जनावरांवर हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपळे दुमाला व मुंगशी आर (ता. बार्शी) परिसरात सोमवारी रात्री उशिरा वाघाने दोन वासरावर हल्ला करून त्यांना ठार केले. त्यानंतर पाठोपाठ लगेच मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास राळेरास (ता. बार्शी) येथील शेतकरी अरुण नामदेव जाधव यांच्या वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.