
पांगरी : येडशी अभयारण्य आणि घाट परिसरात वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. शनिवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास येडशीचे रहिवासी विलास काळे मोटारसायकलवरून जात असताना त्यांना वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. वाघाने पुणे-लातूर महामार्ग ओलांडून घोळवेवाडीच्या दिशेने कूच केल्याचे त्यांनी सांगितले.