
सोलापूर : फ्लाय ९१ या गोवास्थित कंपनीची २३ डिसेंबरपासून गोवा-सोलापूर व सोलापूर- मुंबई अशी विमानसेवा सुरू होणार आहे. मुंबई इतकी सोलापूरकरांना तिरुपती मार्गावर विमानाची गरज आहे. गोवा पर्यटनापेक्षा तिरुपतीची क्रेझ सोलापूरमध्ये जास्त आहे. मात्र, तिरुपती व अयोध्या या मार्गावर विमानसेवा सुरू होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.