तिसंगी सोनके तलाव उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याने भरला 

तिसंगी सोनके तलाव उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याने भरला 
Updated on

सांगोला(सोलापूर)ः  तिसंगी सोनके तलाव या वर्षी पहिल्यांदाच उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याने 90 टक्के भरला गेला आहे. शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी इतर तलाव भरून घेतले जाणार आहेत. 

नीरा उजवा कालव्याच्या सुरु असणाऱ्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील तिसंगी सोनके तलाव 90 टक्के भरून घेतला असून सध्या चिंचोली तलाव, हलदहिवडी व महिम पाझर तलाव ही तलावे पूर्णपणे भरून घेण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 
तिसंगी तलाव हे उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याने 90 टक्के भरून घेतले असल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे. सांगोला तालुका हा दुष्काळी तालुक्‍यांच्या यादीतील तालुका आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे तालुक्‍याला त्याच्या हक्काचे पाणी मिळत नव्हते. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नातुन सांगोला तालुक्‍यासाठी मंजूर असणाऱ्या सर्व योजनांचे पाणी 100 टक्के पूर्ण क्षमतेने आणण्यास मोठे यश मिळविले आहे. यामध्ये सध्या सुरु असणाऱ्या नीरा उजवा कालव्याच्या उन्हाळी आवर्तनामधून तिसंगी सोनके तलावात पाणी सोडलेले आहे. 

मोठा पाऊस पडला तर तलावातील पाणी व पावसाचे पाणी यामुळे तलाव फुटू नये म्हणून तिसंगी सोनके तलाव हा 90 टक्के भरून घेतला आहे. तसेच चिंचोली तलाव, हलदहिवडी व महीम पाझर तलाव भरले जाणार आहेत. तिसंगी तलावाची निर्मिती झाल्यापासून एकदाही उन्हाळी आवर्तनाचे पाणी तलावास मिळाले नव्हते. त्यामुळे तिसंगी तलावाच्या इतिहासात प्रथमच उन्हाळी आवर्तनाने तलावाची तहान भागविली जात आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी मोठी संधी सापडली आहे. 


तालुक्‍याला पाणी मिळवून देण्याचे प्रयत्न 
पाण्यासाठी श्रेयवादाच्या राजकारणात मी पडणार नाही. विविध योजनांचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे 
- शहाजीबापू पाटील, आमदार सांगोला. 

संपादनः प्रकाश सनपूरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Solapur city police
Marathi News Esakal
www.esakal.com