

Emotional Foot March in Solapur Honors Sambhaji Maharaj with Silent Resolve
sakal
सोलापूर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त शहरात भावपूर्ण वातावरणात ‘मूक पदयात्रा’ काढण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सोलापूर विभागातर्फे आयोजित या पदयात्रेत शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले. सहभागींच्या चेहऱ्यावर शंभूराजांच्या बलिदानाचा इतिहास आणि डोळ्यांत कृतज्ञतेची भावना स्पष्ट दिसत होती.