सुनेला मुल होत नसल्याने सासरच्यांनी 'हे' केले...नक्‍की वाचा 

mahilecha chal
mahilecha chal
Updated on

सोलापूर : विवाहानंतर महिलेला मुलबाळ होत नसल्याने सासरच्यांनी दवाखान्यातून उपचारही घेतले मात्र, मुलबाळ झाले नाही. दरम्यान, विवाहात तुझ्या माहेरच्यांनी मानपान केला नाही, तुझ्या दवाखान्याचा खर्चही परवडत नाही. उपचारासाठी व पतीला नोकरीही नसल्याने माहेरुन पाच लाख रुपये घेवून ये म्हणत पतीसह सासू, सासरे व नणंद यांनी त्रास दिल्याची फिर्याद विवाहितेने सलगर वस्ती पोलिसांत दिली आहे. त्यानुसार सर्व आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सोलापुरातील महिलेचा विवाह 30 डिसेंबर 2015 मध्ये कुणाल देविदास गायकवाड याच्याशी झाला. विवाहानंतर काही दिवस त्यांचा संसार सुखाचा होता. त्यानंतर लगेचच सासरच्यांनी त्यांचे रुप दाखविले. विवाहात तुझ्या आई- वडिलांनी मानपान नीट केला नाही. काही संसारपोयोगी वस्तूही दिल्या नाहीत, असे म्हणत टोमणे मारायला सुरवात केली. तुला सासरी येथे सर्वकाही फुकटचे वाटते का, असे विचारत जाच केला. तुझ्या नवऱ्याला नोकरी नाही, तुझ्या दवाखान्याचा खर्चही परवडत नाही, त्यामुळे माहेरुन पाच लाख रुपये घेवून ये म्हणूनही छळ केला. दुसरीकडे तु माझ्या भावाची बायको म्हणून शोभत नाही म्हणून नणंद प्रियंका मंजुनाथ सितापुरे हिने त्या विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विवाहितेच्या आई- वडिलांनी मुलीच्या सासरच्यांना समजवून सांगितले मात्र, ते हुंड्यावर ठाम राहिले. याला कंटाळून विवाहितेने थेट पोलिस ठाणे गाठले आणि सासरच्यांविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार पती कुणाल देविदास गायकवाड, सासरा देविदास कृष्णा गायकवाड, सासू अनिता देविदास गायकवाड आणि नणंद प्रियंका सितापुरे यांच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला. ही घटना सोलापुरातील सेटलमेंट फ्रि कॉलनी येथे घडली आहे. 


दारु पिण्यास पैसे न दिल्याने मारहाण 
सोलापुरातील संगमेश्‍वर नगरात राहणाऱ्या सिराज रजाक जकलेर याने दारु पिण्यास दोनशे रुपये न दिल्याने घराजवळील अकबर म. रफिक सय्यद यांना हाताने व लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करुन जखमी केल्याची घटना मल्लिकार्जून नगरात घडली. दरम्यान, दारुच्या नशेतील सिराजला पैसे नाहीत म्हणल्याने मारहाण केल्याची फिर्याद अकबर यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे. 


मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाविरुध्द गुन्हा 
सोलापूर- विजयपूर रोडवरुन तायप्पा सिद्राम साखरे (रा. जुनी धोंडीबा वस्ती, सिध्दारुढ मठ, रामवाडी) हे बुधवारी (ता. 5) बहिणीकडे पायी जात होते. सोरेगावच्या पुढे गायकवाड फार्म हाऊसजवळ आल्यावर मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये तायप्पा गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, मात्र गुरुवारी (ता. 6) त्यांचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर विजापूर नाका पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com