यंदाच्या अक्षय्य तृतीयेलाही खरेदीचा मुहूर्त नाही ! कोरोनामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प

लॉकडाउनमुळे यंदाच्या अक्षय्य तृतीयेलाही व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे
Akshayy Trutiya
Akshayy TrutiyaEsakal
Updated on

सोलापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय्य तृतीया (Akshayy Trutiya सण कोरोनाच्या (Covid-19) सावटाखाली आज (शुक्रवारी) घरोघरी साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने दागिने, (Jewellery) वाहन, गृहोपयोगी वस्तू, घर- जागा खरेदी (Buying vehicles, household items, home-space) यातून दरवर्षी होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल यंदाही होऊ शकणार नाही. यामुळे व्यावसायिकांना (Traders) मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. मागील वर्षीही लॉकडाउनमुळे (Lockdown) अर्थकारणाला मोठा फटका बसला होता. (Traders have also suffered losses due to the lockdown this year)

कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यातही रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. परिणामी, जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावले आहेत. परंतु यामुळे सर्वच धर्मीयांच्या सण- उत्सवांवर गदा आली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या पालनामुळे अनेक सण- उत्सव घरात साजरे करावे लागत आहेत. सर्वांत महत्त्वाचा सण अक्षय्य तृतीया कोरोनाच्या सावटाखाली साजरा होणार आहे.

Akshayy Trutiya
अखेर उजनी धरण प्लसमधून मायनस 0.07 टक्के ! उपयुक्त पाणीसाठा संपला

असे आहे अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

वैशाख महिन्यात शुक्‍ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया सणाच्या निमित्ताने देव- पितरांचे ऋण फेडण्यासाठी दान केले जाते, हवन केले जाते. या तिथीत जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) असते, असे मानले जाते. तसेच या तारखेला नवीन वस्त्र, दागिने, घर- जागा, वाहन खरेदी केल्यास त्या कायम टिकतात. सोने खरेदी केल्यास कायम संपत्ती येते. तसेच पितरांचे पूजन करण्यासाठी गोड-धोड पदार्थ तयार केले जातात.

Akshayy Trutiya
42 दिवसांत 634 मुले कोरोनाबाधित ! माढा तालुक्‍यात बाधित मुलांची संख्या लक्षणीय

दरवर्षी अक्षय्य तृतीयेला मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू केल्याने सर्व दुकाने बंद असल्याने यंदाच्या वर्षी देखील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मागील वर्षी देखील अक्षय्य तृतीययेला दुकाने बंद असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.

- गिरीश देवरमणी, सराफ व्यावसायिक

उन्हाळ्याच्या एप्रिल-मे महिन्यात इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. यामध्ये साधारणतः अनेकजण अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत असतात. मात्र मागील वर्षी लॉकडाउन आणि यंदाच्या वर्षीही कडक निर्बंध असल्याने व्यवसाय बुडाला आहे.

- ईश्वर मालू, इलेक्‍ट्रॉनिक व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com