अखेर उजनी धरण प्लसमधून मायनस 0.07 टक्के ! उपयुक्त पाणीसाठा संपला

अखेर उजनी धरण प्लसमधून मायनसमध्ये आले असून, उपयुक्‍त पाणीसाठा संपला आहे
Ujani (-)
Ujani (-)Canva

केत्तूर (सोलापूर) : पाऊस नाही नाही म्हणत पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भीमा खोऱ्यात व पुणे जिल्हा परिसरात झालेल्या जोरदार पावसाच्या बळावर गतवर्षी उजनी धरण (Ujani Dam) 111 टक्के म्हणजे 123 टीएमसी भरले होते. पण गुरुवारी (ता. 13) दुपारी त्यातील पाण्याचा उपयुक्त साठा संपल्याने उजनीने तळ गाठला असून, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी उजनी धरणाचा प्लसमधून मायनसमध्ये प्रवेश झाला आहे. (Ujani Dam has finally come to Minus from Plus and has run out of useful water)

2020 वर्षात उजनीचा पाणीसाठा याच महिन्यात प्लसमधून मायनसमध्ये 13 मे रोज झाला तर याही वर्षी 13 मे रोजीच उजनी धरण मायनसमध्ये गेले आहे. दोन वर्षांपूर्वी 15 मे 2019 रोजी उजनी धरण मायनस 38 टक्के होते, तर पाणीसाठा 43.16 टीएमसी होता. त्या तुलनेत गेली दोन वर्षे धरणात मे महिन्याच्या मध्यावर ही अचल पाणीसाठा 63.00 टीएमसी आहे. पावसाळा सुरू होईल इथपत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने सिंचनाचा व पाणीपुरवठ्याचा प्रश्न उद्‌भवणार नसला तरी सध्या मुख्य कालव्यातून 3150 क्‍युसेक तर सीना-माढा 296, दहिगाव उपसा सिंचन 85 क्‍युसेकने विसर्ग धरणातून चालू आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत आणखी किती पाणीसाठा खालावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ujani (-)
शहर-जिल्ह्यात 1625 नवे कोरोना बाधित ! 44 जणांचा मृत्यू

उजनी धरणाच्या 123 टीएमसी पाणी साठ्यापैकी 54 टीएमसी पाणी उपयुक्त तर 63 टीएमसी हा मृतसाठा धरला जातो, तर 6 टीएमसी पाणी अतिरिक्त पाणी आहे. कारण, उजनी धरण 100 टक्के भरते त्या वेळी 117 टीएमसी पाणी असते आणि 111 टक्के पाणी साठवले जाते. त्या वेळी पाणीसाठा 123 टीएमसी होते. सध्या उजनी धरणातील 63 टीएमसी पाणी संपले गेले.

उजनी धरणातील पाण्यावर किमान 45 साखर कारखाने व दहा औद्योगिक वसाहती चालतात. तसेच सोलापूर शहरासह शेकडो गावांचा पाणीपुरवठा याच धरणाद्वारे होतो. तर हजारो हेक्‍टर शेतीला सिंचनाची सोयही होते. यामुळे उजनी धरणाला राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष उजनीच्या पाण्यावर लागून असते.

Ujani (-)
माजी मंत्री तानाजी सावंत दौरा : शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य अन्‌ अधिकाऱ्यांची धावपळ

उजनी धरणातून गेल्या आठ दिवसांपासून दररोज एक टक्का पाणी कमी होत आहे. आज उजनी धरणाचा पाणी साठा 0.78 टक्के एवढा खाली आला आहे. त्यामुळे उजनी धरण उपयुक्त (प्लस) साठ्यातून मृत साठ्यात (मायनस) प्रवेश केला आहे.

भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागल्याने लवकरच नदीत पाणी सोडावे लागणार आहे. त्यात सद्य:स्थितीत उजनी कालवा, बोगदा, सीना-माढा जलसिंचन योजनेत पाणी सोडले जात आहे. धरणकाठचा उपसा सिंचन, बाष्पीभवन आदी कारणांमुळे उजनीची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. भीमा नदीत मेमध्येच पाणी सोडणार असल्याचे उजनी अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.

विसर्ग

  • नदी : बंद

  • कालवा : 3150 क्‍युसेक

  • बोगदा : 630 क्‍युसेक

  • दहीगाव : 85 क्‍युसेक

  • सीना-माढा सिंचन योजना : 296

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com