
सोलापूर ः शहरातील टेक्स्टाईलच्या परंपरेत अन्य वस्त्रपरंपरा वेगळी ओळख निर्माण करू शकते, हे लक्षात घेत येथील श्रध्दा काबरा यांनी त्यांच्या माहेरची म्हणजे लखनऊच्या हाताने तयार केलेली वस्त्राची परंपरा रुजवण्याचे काम केले आहे. या प्रकारच्या हाताने तयार केलेल्या भरजरी वर्कचे हे दालन काम करणाऱ्या कामगारांना रोजगाराचे साधन बनले आहे.
श्रध्दा काबरा यांचे माहेर हे लखनौचे. लग्नानंतर त्या सोलापुरात सासरी आल्या. सोलापूरची कापड निर्मिती अगदी नावाजलेली आहे. या परंपरेत आपण काही तरी भर घालू शकतो का, याचा विचार केला तेव्हा त्यांना लखनौची वस्त्र परंपरा समोर आली. लखनौमध्ये शेकडो कामगार कुटुंबे ही विशेष प्रकारच्या डिझाईनच्या आधारे लखनवी वस्त्रे तयार करतात. लखनौ म्हटले की तेथील रुबाबदार जीवनाची ओळख त्यातून होते. मात्र ही वस्त्रे प्रत्यक्षात तयार करण्यासाठी कोणत्याही यंत्राचा वापर न करता हे कामगार हाताने करत असतात.
हीच लखनवी परंपरा सोलापुरात आणण्यासाठी श्रध्दा काबरा यांनी प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला माहेराहून काही तयार कपडे त्या घेऊन त्याची विक्री करत असत.
त्यांचे कुटुंब हे एकत्र कुंटुब आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले. त्यांच्या कुटुंबात कापड व्यापारात कुणीही नाही. त्यांच्या या प्रयत्नाला चालना मिळत गेली. साड्या, लेहंगा, कुर्ती, टॉप या प्रकारच्या भरजरी काम केलेल्या कपड्यांच्या विक्रीचे काम सुरु झाले. या प्रकाराची हाताने काम केलेल्या लखनवी कशिदाकारीची ओळख सोलापूरकरांना व्हावी, म्हणून त्यांनी काही प्रदर्शनेदेखील भरवली. त्यातून लखनवी परंपरा लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले. आता त्याला प्रतिसाद केवळ सोलापूर नव्हे, तर अगदी पुण्या-ंबईपर्यंत मिळतो आहे. अत्यंत वेगळ्या प्रकारचे भरजरी कशिदा काम हे तर आकर्षण आहे. पण हे काम हाताने केलेले असल्याने त्याचे टिकाऊपणदेखील अधिक असते. या माध्यमातून त्यांनी लखनौ कपड्यांची पंरपरा सोलापुरात कायमची रुजवण्याचे काम चालवले आहे. आजही दहा ते पंधरा कामगार कुटुंबांना या कामातून रोजगार देण्याचे काम त्या करत आहेत. हे करत असताना त्या अनेक सामाजिक कार्यामध्येदेखील सहभागी असतात.
एकत्र कुटुंबात विकासाची अधिक संधी
अशा प्रकारचे काही काम करत असताना श्रध्दा काबरा यांना सातत्याने त्यांच्या घरातील एकत्र कुटुंबाचा आधार मोलाचा वाटतो. या पध्दतीने कुटुंबात प्रत्येक सदस्याला स्वत:च्या विकासाची संधी मिळते. हे काम करत असताना त्यांना या कुंटुबाचे मोठेच प्रोत्साहन मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.