husband and wife burnt
मोहोळ - पती-पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या केल्याची घटना भांबेवाडी, ता. मोहोळ येथे शुक्रवार ता. 2 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेची नोंद रात्री उशिरा मोहोळ पोलिसात करण्यात आली.