
मोहोळ - पोळ्याच्या सणाचे साहित्य खरेदीसाठी गेलेल्या एका युवकाचा कंटेनरचे चाक डोक्यावरून जाऊन झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ जवळील सिद्धेश्वर नगर येथे शुक्रवार ता. 22 रोजी सकाळी साडेदहा वाजता झाला. बळीराम हरिभाऊ निळे (वय-31) रा. वडाचीवाडी, ता. माढा असे मृताचे नाव आहे.