

Police and locals gather at the spot after a fatal two-wheeler accident on the Solapur–Pune highway.
sakal
सोलापूर: पुण्याहून गावी चिंचोडी (ता. निलंगा, जि. लातूर) येथे निघालेला दुचाकीवरील १७ वर्षीय मुलगा सोलापूरजवळ झालेल्या अपघातात ठार झाला. तो मुलगा तालुक्यातील ओळखीच्या अजय मारुती कांबळे (वय १९) याच्या दुचाकीवर मागे बसून गावी जात होता. रविवारी (ता. १४) सकाळी सहाच्या सुमारास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगावजवळील टाटा मोटार्स शोरूमसमोर अपघात झाला.