

Deadly Road Mishap: Two Friends Die, Three Critical in Tractor–Car Crash
sakal
बार्शी शहर : खांडवी (ता. बार्शी) येथे लोखंडी सळईने भरलेल्या ट्रॅक्टरला कारची मागून धडक बसल्याने कारमधील चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी साडेसात-आठच्या सुमारास घडली.