

Pandharpur Bridge Mishap: Car Falls Into River, Major Casualties Reported
Sakal
पंढरपूर : ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने भीमा नदीच्या पुलावरून सुमारे २५ फूट खाली नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (ता. ११) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील पंढरपूर-टेंभुर्णी मार्गावरील चंद्रभागा नदीच्या अहिल्यादेवी पुलावर घडला.