Devotion turns tragic: Student with a heart defect dies climbing Sajjangad; cardiac arrest suspected.Sakal
सोलापूर
दुर्दैवी घटना! 'हृदयाला छिद्र तरी सज्जनगड चढण्याचा हट्ट बेतला जीवावर'; विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
Sajjangad Tragedy: आपण हृदयाने कमजोर असून देखील आपण गड चढल्याचा तिला यावेळी आनंद झाला होता. देवदर्शन घेतल्यानंतर तिने वडिलांशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. ‘पप्पा, मी गड चढला,’ असे देखील तीने सांगितले. त्यानंतर तिला हृदयाचा त्रास सुरू झाला. ती अचानक बेशुद्ध होऊन कोसळली.
करमाळा : हृदयाला छिद्र होते. सोबत सहलीला आलेल्या मैत्रिणींनी सज्जनगड न चढण्याचा आग्रह केला. तरीही मला गडावर जायचे आहे हा हट्ट करमाळ्यातील मुलीच्या जीवावर बेतला. गडावर चढून आई-वडिलांना व्हिडिओकॉल करून आनंद व्यक्त केला. मात्र नंतर हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.

