वैराग : बार्शी तालुक्यातील हिंगणी (पा) येथे नदीवरील बंधाऱ्याजवळ खेळत असताना अंगावर वायर पडून विजेचा धक्का लागून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा ते रात्री दहाच्या दरम्यान घडली. संदीप बालाजी पवार (वय १२) रा. हिंगणी (पा) असे मृत मुलाचे नाव आहे. सदर घटनेबाबत मुलाचा चुलता रामचंद्र मधुकर पवार याने वैराग पोलिसात खबर दिली आहे.