
-संतोष पाटील
टेंभुर्णी : काम नीट येत नाही. रानातील काम करीत नाही. ट्रॅक्टर घेण्याकरिता सात लाख रूपये देत नाही म्हणून विवाहित तरूणीस तिचा नवरा, सासू व सासरे मानसिक त्रास देऊन तिचा जाच हाट करून मारहाण करीत होते. नवरा, सासू सासरे यांनी केलेला छळ, जाचहाट व तिला दिलेल्या मानसिक व शारिरीक त्रास असह्य झाल्याने या विवाहित तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ही दुदैवी घटना माढा तालुक्यातील दहिवली येथे गुरूवारी सकाळी सात वाजण्यापूर्वी घडली असून काजल नारायण मिस्कीन (वय 25 रा. दहिवली ता.माढा ) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरूणीचे नाव आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नवरा सासू सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.