

Cement Bulker Mishap Claims Woman’s Life; Family in Shock at Tembhurni
Sakal
टेंभुर्णी : दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेच्या पायावरून सिमेंट बल्करचे चाक गेल्याने गंभीर जखमी होऊन महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. टेंभुर्णीतील करमाळा चौकात शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी बल्कर ताब्यात घेतला, मात्र चालक फरार झाला आहे. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.