
कुर्डुवाडी : माढा व वाकाव रेल्वे स्थानकांदरम्यान पंढरपूर- म्हैसूर गोलघुमट एक्स्प्रेसखाली आल्याने दोनजण ठार झाले व एक जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (ता. २७) दुपारी दोन ते सव्वा दोनच्या दरम्यान घडली. राहुल बेंजरपे (वय ३४) व विजय कैय्यावाले (वय ६०, दोघे रा. उत्तर सदर बझार, सोलापूर) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. संजय गिरबोने हे जखमी आहेत.