esakal | रेल्वे प्रवाशांसाठी ! झेलम, गोवा एक्‍स्प्रेस रद्द 
sakal

बोलून बातमी शोधा

railway canceled
  • रुळ दुरुस्ती अन्‌ दुहेरीकरणाचे काम युध्दपातळीवर 
  • रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत 
  • सोलापूर विभागातून जाणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलले तर काही गाड्या रद्द 
  • आजपासून 1 मार्चपर्यंत विविध गाड्यांचे वेळापत्रक बदलले 

रेल्वे प्रवाशांसाठी ! झेलम, गोवा एक्‍स्प्रेस रद्द 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर- वाडी सेक्‍शनमधील बोरोटी- दुधनी- कुलाली स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकच्या (दुहेरीकरण) कामासाठी रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलेले आहेत. 


हेही नक्‍की वाचा : बळीराजासाठी ! ठिबक अनुदानासाठी 20 फेब्रुवारीची डेडलाईन 


दुहेरीकरणाच्या कामामुळे 16 ते 25 फेब्रवारीपर्यंत सोलापूर विभागातून धावणारी हसन- सोलापूर एक्‍सप्रेस, सोलापूर- हसन एक्‍सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 17 ते 26 फेब्रुवारीपर्यंत हसन- सोलापूर एक्‍सप्रेस कलबुर्गी स्थानकापर्यत धावणार आहे. 18 ते 27 फेब्रवारीपर्यंत सोलापूर- हसन एक्‍सप्रेस कलबुर्गी स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटणार आहे. तसेच सोलापूर विभागावरील बोरोटी ते दुधनी रेल्वे स्टेशनदरम्यान 18 फेब्रुवारीला रेल्वे रुळ दुरुस्ती व दुहेरीकरणाच्या कामामुळे रस्ते वाहतुकीस तेथील क्रॉसिंग गेट बंद राहील, असेही रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. 


हेही नक्‍की वाचा : भाजपचा एक खासदार होणार कमी ! 


झेलम अन्‌ गोवा एक्‍सप्रेस रद्द 
उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागातील हजरत निजामुद्दीन- पलवल सेक्‍शनमधील फरिदाबाद स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकींगच्या कामामुळे 1 मार्चपर्यंत सोलापूर विभागावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत पुणे-जम्मूतावी झेलम एक्‍सप्रेस रद्द करण्यात आली असून 27 ते 29 फेब्रुवारीपर्यंत जम्मूतावी- पुणे झेलम एक्‍सप्रेसही रद्द केली आहे. 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत वास्को- द- गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्‍सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर 26 ते 28 फेब्रुवारीपर्यंत हजरत निजामुमुद्दीन- वास्को- द- गामा गोवा एक्‍सप्रेसही रद्द केली आहे. 26 फेब्रुवारीला यंशवतपूर- चंदिगढ एक्‍सप्रेसही रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच 29 फेब्रुवारीला चंदिगढ- यंशवतपूर एक्‍सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. 

loading image