
सोलापूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचालक, वाहकांच्या मोफत प्रवास पासच्या कालावधीत दोन महिने वाढीचा सकारात्मक निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. पूर्वी दोन सत्रात प्रत्येकी एकेक महिन्याचा पास दिला जात होता. आता एका सत्रात प्रत्येकी दोन महिने मोफत प्रवास पास दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांना कुटुंबासह चार महिने फिरता येणार आहे.