सोलापूर : विश्वसुंदरी नको तर वृक्षसुंदरी किताब सुरु करा; अभिनेते सयाजी शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tree planting save Nurture Sahyadri Devrai Actor Sayaji Shinde

सोलापूर : विश्वसुंदरी नको तर वृक्षसुंदरी किताब सुरु करा; अभिनेते सयाजी शिंदे

बार्शी : निसर्गाचा बिघडत असलेला समतोल हा मानवासाठी धोक्याची घंटा आहे त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे, शाळेसह सर्वत्र बीज,रोपे व देवराई असा त्रिसुत्री कार्यक्रम राबवावा लागणार आहे वृक्षलागवड व झाडे ही जगवलीच पाहीजेत आज सर्वत्र विकासांच्या नावाखाली वृक्षांची कत्तल केली जात आहे हे चुकीचे आहे आता विश्वसुंदरी नको तर वृक्षसुंदरी किताब सुरु करण्याची गरज आहे असे प्रतिपादन सिनेअभिनेते, सहयाद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे यांनी केले.

मातृभूमी प्रतिष्ठान व श्री.भगवंत मल्टीस्टेट बार्शी यांच्यावतीने भगवंत प्रकटोत्सवनिमित्त आयोजित'भगवंत व्याख्यानमालेत 'आस्था आणि आनास्था'या विषयावर पहिले पुष्प गुंफताना शिंदे बोलत होते अध्यस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव पी.टी. पाटील होते. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून तीन दिवसीय व्याख्यानमालेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले, उद्योजक शशिकांत जगदाळे, मार्गदर्शक सनदी अधिकारी अविनाश सोलवट, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, डॉ.आनंद कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल आदी उपस्थित होते.

सयाजी शिंदे पुढे म्हणाले, प्रत्येकाने आपण निसर्गाबरोबर प्रामाणिक आहोत का हे स्वत:ला विचारलं पाहीजे शालेय जीवनांपासूनच मुलांना झाडांचे महत्व पटवून द्या शाळेत जन्मदाखल्यासोबत देशी झांडांच्या बियां घेवून आल्याशिवाय प्रवेश देऊ नका, मुलांना अ आ ई शिकवण्याआधी बी व झाडांचे महत्व समजून सांगा. शाळेत झाडांविषयी चर्चा झाल्या पाहिजेत प्रत्येक शाळेत बीज बँक बनली पाहीजे त्याची रोपवाटीका बनवून पुढे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपण केले पाहिजे भावी पिढीतील मुलांना नेता,अभिनेता सेलिबिटी नव्हे तर झाड सेलिब्रिटी वाटले पाहिजे याबाबत शासनाने जीआर काढावा असे सूचित केले.

Web Title: Tree Planting Save Nurture Sahyadri Devrai Actor Sayaji Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top