esakal | सोशलवर मीडियावर आता ‘हा’ ट्रेंड सुरु आहे
sakal

बोलून बातमी शोधा

The trend is now on social media

फॅशनच्या दुनियेत नव्याने रोज कोणती ना कोणती फॅशन पहावयास मिळते. त्यात साडी म्हणलं तर आजकाल प्रत्येक स्त्रियांना नेहमीच आवडते आणि नेहमीच साडीत स्त्रीया अधिकाधिक सुंदर दिसतात. कोणत्याही समारंभासाठी साडीलाच पहिली पसंती देतात. 'साडी इज सो टिपीकल' म्हणा-या मुलीही याच साडीतील सुंदर सुंदर फोटो सध्या व्हाॅट्स अॅप स्टेट्सवरअपलोड करत आहेत. सध्या सोशल मीडियावर 'गर्ल्स इन ट्रॅडिशनल वेअर' असा ट्रेंड सुरू झाला आहे.

सोशलवर मीडियावर आता ‘हा’ ट्रेंड सुरु आहे

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

सोलापूर : सोशल मीडियाने देशभरात सर्वांनाच वेड लावले आहे. सध्या गेल्या दोन तीन दिवसात जुने जुने फोटो फेसबुकवर टाकण्याचा ट्रेंड आला होता. मात्र त्यात मुलांच्या तुलनेत मुली मागे असल्याचे जाणवत होते. परंतु आता मुलींचा एक नवा ट्रेंड आला आहे. तो म्हणजे सर्वजण ट्रॅडिशनल साडीवरील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहेत. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर 'गर्ल्स इन ट्रॅडिशनल वेअर 'हा ट्रेण्ड सुरू झाला आहे. अनेक जणी ट्रॅडिशनल साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचे दिसत आहे.
फॅशनच्या दुनियेत नव्याने रोज कोणती ना कोणती फॅशन पहावयास मिळते. त्यात साडी म्हणलं तर आजकाल प्रत्येक स्त्रियांना नेहमीच आवडते आणि नेहमीच साडीत स्त्रीया अधिकाधिक सुंदर दिसतात. कोणत्याही समारंभासाठी साडीलाच पहिली पसंती देतात. 'साडी इज सो टिपीकल' म्हणा-या मुलीही याच साडीतील सुंदर सुंदर फोटो सध्या व्हाॅट्स अॅप स्टेट्सवरअपलोड करत आहेत. सध्या सोशल मीडियावर 'गर्ल्स इन ट्रॅडिशनल वेअर' असा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळेच ट्रॅडिशनल लूक असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर स्टेटस द्वारे ठेवून शेअर केला जात आहे. प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो प्रत्येकाची आपली एक स्टाइल असते. त्याच पद्धतीने मराठमोळी  ट्रॅडिशनल लूक प्लस साजशृंगार केलेला फोटो सुंदरच दिसतो. नवीन फॅशन विश्वातही साडी महत्त्वाची ओळख प्राप्त केलेली आहे. कोणताही कार्यक्रम असो मुली आणि महिला साडीला पहिली पसंती देतात. साडी ही स्त्रियांची सुंदरता वाढवते असं म्हटलं जातं की 'बदल नियमित असो' परंतु जेव्हा फॅशनचा विषय येतो तेव्हा खरे ठरत नाही. सोशल मीडियाद्वारे फोटो शेअर होत आहे ते पाहता अनेक शतकापासून पारंपारिक साडीचा ट्रेंड आजही कायम आहे यातूनच समजून येत आहे.

loading image