
Munzareen Jailer, who studied in Urdu medium, achieves success as District Judge through perseverance and dedication.
Sakal
सोलापूर: घरात संवादाची भाषा हिंदी व मराठी. माध्यमिक शिक्षण उर्दू माध्यमातून. असे असताना पदवीला इंग्रजी विषय घेतला. ही भाषा आत्मसात केली. याच्या जोरावर मुंझरीन जेलर या विद्यार्थिनीने तर थेट जिल्हा न्यायाधीश पदावर झेप घेत यशाला गवसणी घातली. यामुळे भाषिक अल्पसंख्याक शिक्षणात नवे चित्र दिसू लागले आहे.