Tuljabhavani Temple
esakal
तुळजापूर : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani Temple) आज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने देवीला ओवस भरण्यासाठी स्थानिक महिला व सुवासिनी मोठ्या संख्येने मंदिरात येतात. त्यामुळे महिलांना शांततेत आणि सुरक्षित वातावरणात दर्शन व धार्मिक विधी पार पाडता यावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.