
तुळजापूर इथलं हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. हॉटेल भाग्यश्रीचा मालक इन्स्टाग्रामवर रील्स शेअर करून हॉटेल बंद असल्याचं सांगतो. त्याच्या या स्टाइलमुळे सुरुवातीला हॉटेल भाग्यश्री ट्रोलही झालं. दरम्यान, मालकाने फॉर्च्युनर घेतल्यानं सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. आता याच हॉटेलमध्ये कर्मचारी आणि तरुणात हाणामारी झालीय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यावरून तीन बाऊन्सर आणल्याचं हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने सांगितलंय.