साडेबारा हजार रेल्वे प्रवाशांनी केले तिकीट रद्द ! रेल्वेने दिला 43 लाखांचा परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Train

साडेबारा हजार रेल्वे प्रवाशांनी केले तिकीट रद्द !

सोलापूर : कोरोना (Covid-19) विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लागू केले. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील घटली. मागील दोन महिन्यात सोलापूर स्थानकावरून (Solapur Railway Station) धावणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांची संख्या रोडावली आहे. 12 हजार 470 प्रवाशांनी तिकीट रद्द करून प्रवास टाळला. या तिकिटांची संख्या 4 हजार 946 आहे. त्यावर, रेल्वे प्रशासनाने 43 लाख 20 हजार 370 रुपयांचा तिकीट परतावा या सर्व प्रवाशांना दिला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. (Twelve thousand train passengers canceled their journey due to lockdown)

हेही वाचा: "उजनी'तून सोडले सोलापूरसाठी पाणी ! 3600 क्‍युसेक विसर्ग

मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये रेल्वे प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले होते. मात्र राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक प्रवाशांनी आपला नियोजित प्रवासाचा बेत रद्द केला आहे. त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक प्रवासी आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी अगोदरच आरक्षण करीत असतात. मात्र मार्च महिन्यापासूनच कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने काही राज्यांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे अनेक प्रवाशांनी आपला निश्‍चित केलेला प्रवासाचा बेत रद्द केला.

तिकीट आरक्षणाचा परतावा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या सोलापूर - सिद्धेश्वर एक्‍स्प्रेस, सोलापूर - पुणे हुतात्मा एक्‍स्प्रेस, सोलापूर - हसन एक्‍स्प्रेस, अहमदाबाद - चेन्नई, मुंबई - गदग आदी गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने या गाड्या तोट्यात धावू लागल्या. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्या रद्द केल्या आहेत. ज्या प्रवाशांनी या गाड्यांचे आरक्षण केले होते, त्या प्रवाशांना तिकीट आरक्षणाचा परतावा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

loading image
go to top