दादपूर येथील वीसवर्षीय युवकाचे अपहरण ! दोघे संशयित आरोपी फरार

Rajvaibhav
Rajvaibhav
Updated on

बेगमपूर (सोलापूर) : दादपूर (ता. मोहोळ) येथील एका वीस वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आले असून, या गुन्ह्यातील संशयित आरोपीही फरार असल्याची माहिती कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली आहे. राजवैभव रघुनाथ कांबळे (वय 20) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव असून, विशाल दत्तात्रय कांबळे (वय 23) व विकी दत्तात्रय कांबळे (वय 19) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. हे दोघे संशयित सख्खे भाऊ आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, की दादपूर येथील राजवैभवचे वडील रघुनाथ कांबळे हे आपल्या कुटुंबासह शेती व्यवसाय करतात. रघुनाथ कांबळे व संशयितांची घरे जवळपासच आहेत. 18 फेब्रुवारीला सायंकाळी राजवैभव हा बाहेर जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडला, परंतु तो अद्याप परतलाच नाही. या प्रकाराची मिसिंग रघुनाथ कांबळे यांनी 19 फेब्रुवारीला कामती पोलिसांत नोंदवली होती. पोलिसांनी या घटनेचा सर्व बाजूने शोध घेतला असता, गावातीलच विशाल दत्तात्रय कांबळे व विकी दत्तात्रय कांबळे या दोघा भावांची नावे संशयित म्हणून पोलिसांच्या समोर आली आहेत. 

परंतु, घटनेनंतर काही दिवसांत दोघेही संशयित आरोपी आपल्या आई व बहिणीसह फरार झाले आहेत. कामती पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणासह संशयित आरोपींच्या तपासासाठी जोरदार मोहीम राबविली असून, पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. अपहरण झालेल्या युवकाची उंची पाच फूट, पाच इंच असून, रंग गोरा, अंगाने जाड, डोळ्याला कमी दिसत असल्याने चालताना चाचपडतो, अंगात निळ्या रंगाचा टी- शर्ट व निळी हाफ पॅंट असून, हा तरुण कोणाला दिसून आल्यास कामती पोलिस ठाण्याशी (02189/245211) या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी केले आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन खटके हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com