
सोलापूर : या वर्षीचा मॉन्सून २७ मे रोजी केरळ किनारपट्टीवर पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यापूर्वीच कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात ठिकठिकाणी ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याप्रमाणे पाऊस धो-धो पडू लागला आहे. सोलापूर शेजारी असलेल्या जिल्ह्यात अवकाळीची जोरदार हजेरी असताना सोलापूर जिल्ह्यातही कोकणासारखा दमटपणा आणि किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस हजेरी लावू लागला आहे.