

Bribe for Utensil Set Supply Exposed in Madha Taluka; Two Contract Staff Arrested
sakal
उपळाई बुद्रूक : बांधकाम कामगारांना शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या गृहोपयोगी भांडी संचासाठी लाच मागणाऱ्या दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. ६) सापळा रचून रंगेहात अटक केली. माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या आवारात ही कारवाई पार पडली.