माढा तालुक्‍यात अपघातात बाप-लेक ठार  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two killed in an accident in Madha taluka

वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या पाठीमागील ट्रॉलीचा झोला बसून जवळून जाणारी मोटारसायकल ट्रॉलीखाली सापडल्याने मोटारसायकलवरील बापलेक जागीच ठार झाले. माढा तालुक्‍यातील आढेगांवजवळ गुरूवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. अपघातामध्ये गोपाळ मच्छिंद्र कुंभार (वय 35), मच्छिंद्र दिगंबर कुंभार (वय 60 रा. चांदज ता. माढा) हे दोघे बापलेक ठार झाले. 

माढा तालुक्‍यात अपघातात बाप-लेक ठार 

sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या पाठीमागील ट्रॉलीचा झोला बसून जवळून जाणारी मोटारसायकल ट्रॉलीखाली सापडल्याने मोटारसायकलवरील बापलेक जागीच ठार झाले. माढा तालुक्‍यातील आढेगांवजवळ गुरूवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. अपघातामध्ये गोपाळ मच्छिंद्र कुंभार (वय 35), मच्छिंद्र दिगंबर कुंभार (वय 60 रा. चांदज ता. माढा) हे दोघे बापलेक ठार झाले. 

याविषयी पोलीसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गाकडून आढेगांवकडे वीट घेऊन (एम एच 45/एफ 1322) हा ट्रॅक्‍टर जात होता. आढेगावनजिक रस्त्यावरील खड्डा चुकविताना ट्रॅक्‍टरच्या पाठीमागील ट्रॉलीला झोला बसल्याने जवळून जाणारी मोटारसायकल (एम एच 45 / यु 8610) ही ट्रॉलीखाली सापडली. त्यामुळे मोटारसायकलवरील गोपाळ कुंभार व मच्छिंद्र कुंभार हे दोघे बापलेक ठार झाले. ऐन दिवाळीच्या सणामध्ये बापलेकाचा अपघातामध्ये दुदैवी मृत्यू झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची माहिती समजताच टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे, अपघात पथकाचे प्रमुख हवालदार अभिमान गुटाळ, मकबूल तांबोळी आदी तातडीने घटनास्थळी आले. अपघातातील मयत बापलेकाचे मृतदेह रूगणवाहिकेतून टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी घेऊन आले. टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शितोळे हे करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 

loading image
go to top