
उ. सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय मार्गावरील कोंडीजवळ (राहुटी) मंगळवारी दुपारी (ता. २३) भीषण अपघात झाला. महामार्गावर थांबलेल्या बल्करला बगल देऊन स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये गेला. यावेळी मोहोळकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ओमिनी कारला टेम्पो जोरात धडकला. त्यात कोळेगावजवळील सुगरण हॉटेलच्या मालकासह कार चालकाचा मृत्यू झाला.