सोलापुर पुणे महामार्गावर अपघात ,दोघांचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident
सोलापुर पुणे महामार्गावर अपघात ,दोघांचा मृत्यु

सोलापुर पुणे महामार्गावर अपघात ,दोघांचा मृत्यु

मोहोळ : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या एका मालट्रकने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात (Accident)दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur-Pune National Highway)यावली शिवारात सकाळी सात वाजता झाला. रोहित गुलबाके व मनोजकुमार गुलबाके दोघे ही रा. चांदोरा खुर्द जिल्हा बैतूल मध्य प्रदेश अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात टोल नाका व्यवस्थापनाच्या त्रुटीमुळे झाल्याची चर्चा परिसरात होती.

हेही वाचा: सोलापूर : आव्हानात्मक स्थितीत 1544 कोटींची निर्यात

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालट्रक क्र. आरजे 9/जीए 5505 ही पुण्याकडे निघाली होती. कुठलीही सूरक्षेची काळजी न घेता पार्किंग लाईट (Parking Light)न लावता रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याच वेळी मालट्रक क्रमांक एम एच 12 एस एक्स 4174 (MH 12 SX 4174)ही ही पुण्या कडे निघाली होती. समोरच्या उभ्या ट्रकने पार्किंग लाईट न लावल्याने तसेच दाट धुक्यामुळे पुढचे काहीही न दिसल्याने पुण्याकडे निघालेल्या दुसऱ्या मालट्रकने उभ्या असलेल्या मालट्रक ला पाठीमागून जोराची धडक दिली, त्यात वरील दोघेजण गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले.

हेही वाचा: सोलापूर : वाहतूक कारवाई थांबवा ;आमदार प्रणिती शिंदे यांचे पोलिस आयुक्तांना पत्र

ही घटना मोहोळ पोलिसांना समजताच त्यांनी दोन क्रेन बोलावून दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तसेच मालट्रक मध्ये अडकलेले मृतदेह ही क्रेनच्या साह्याने बाजूला काढले. दरम्यान टोल नाका प्रशासन टोलवसुली करते मात्र तशा सोयीसुविधा प्रवाशांना मिळत नाहीत. अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असतात, महामार्गावर गस्त घालणाऱ्या वाहनांचीही यात हायगय दिसून येते. थोड्या चुकीमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत व त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.या अपघाताची खबर अमर प्रभू डोंबे यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top