सोलापूर : आव्हानात्मक स्थितीत 1544 कोटींची निर्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

export
सोलापूर : आव्हानात्मक स्थितीत 1544 कोटींची निर्यात

सोलापूर : आव्हानात्मक स्थितीत 1544 कोटींची निर्यात

- प्रकाश संपूरकर

सोलापूर : कोरोनाचे (Corona)अडथळे ओलांडून जिल्ह्याने सरत्या वर्षात 1 हजार 544 कोटी रुपयांच्या निर्यातीचा (Export)आकडा गाठला आहे. यामध्ये सर्वाधिक निर्यात साखरेची(Sugar) झाली आहे. त्या खालोखाल गूळ, केळी आदीची निर्यात सकारात्मक पध्दतीने वाढल्याचे दिसून येते. संपत्या वर्षामध्ये कोरोनाची स्थिती गंभीर स्थिती सोलापूर जिल्ह्याने अनुभवली. त्यातून कसेबसे सावरत शेवटच्या टप्प्यात जिल्ह्याचा निर्यातीचा आकडा चांगल्या पध्दतीने वाढला. जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा 45 पेक्षा अधिक साखर कारखान्यांनी साखरेची निर्यात केली. निर्यातीसाठी सर्वात मोठा आयातदार देश अफगणिस्थान (Afghanistan)आहे. जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या गुळाची निर्यात इंडोनेशियामध्ये झाली.

हेही वाचा: लग्नाच्या विचारानं पडला रक्ताचा सडा; पोरानेच केली बापाची हत्या

ताजी केळी व सुकवलेल्या केळीची निर्यात इंडोनेशियामध्ये (Indonesia)करण्यात आली. टेरी टॉवेलची निर्यात अमेरिकेला (America)करण्यात आली आहे. याशिवाय निटेड कॉटन कपड्यांची निर्यात युनायटेड, अरब इमारतला करण्यात आली आहे. जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या वस्तूमध्ये संपत्या वर्षात एकूण दहा वस्तूंचा समावेश होता. यामध्ये साखर, गूळ, केळी, टेरीटॉवेल, निटेड कॉटन क्रोच, लॅक्‍टम ऍसिड, पायरिडीन डेरिव्हेटीव्ह, कॅम आणि क्रॅक शाफ्ट, सॅक्‍स आणि बॅग्ज, प्रायमरी रिक्‍लेम्ड रबर आदींचा समावेश आहे. एकूण 80 वस्तूंची निर्यात सोलापुरातून केली गेली. जिल्ह्यातील 12 हजारापेक्षा अधिक उद्योगांनी या निर्यात प्रक्रियेत त्यांचे योगदान दिले आहे. यामध्ये डाळिंब व इतर शेतीमालाची निर्यात मध्यस्थांमार्फत झाल्याने त्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झालेली नाही.(Solapur news)

हेही वाचा: भाजप नेत्यांवरील कारवाईनंतर चित्रा वाघ संतापल्या

निर्यातीची आकडेवारी

 • साखर - 308 कोटी रुपये (अफगणीस्थान)

 • गूळ- 159 कोटी रुपये (इंडोनेशिया)

 • केळी - 118 कोटी रुपये (इराण)

 • टेरी टॉवेल - 97.84 कोटी (यूएसए)

 • विणलेले कापड - 85. 39 कोटी (यूएई)

 • लॅक्‍टम ऍसिड - 71.23 कोटी (इटाली)

 • डेरव्हेटीव्हज ऑफ पायरीडीन - 66. 46 कोटी (यूके)

 • शाफ्टचे प्रकार - 64.88 कोटी (स्पेन)

 • सॅक व पॅकेजिंग बॅग्ज - 38.50 कोटी (इस्त्रायल)

 • रिक्‍लेम्ड रबर - 37.47 कोटी (श्रीलंका)

 • डाळिंब - 4.49 कोटी (यूएई, नेदरलॅंड, सौदी अरेबिया, कतार, ओमान)

 • ज्वारी - 7.79 कोटी (यूएसए, नायजेरीया, कॅनडा, यूके)

Web Title: Exports Of Rs 1544 Crore In Challenging Conditions

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurExport
go to top