esakal | शहरातील "हे' दोन प्रभाग हॉटस्पॉट ! जिल्ह्यात वाढले आज 905 रुग्ण; 1312 रुग्णांची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

शहरातील रुग्णसंख्या 50 पेक्षा कमी झालेली असतानाच आज 57 रुग्ण आढळले तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीणमध्ये टेस्टिंग कमी करूनही रुग्ण कमी झालेले नाहीत.

शहरातील "हे' दोन प्रभाग हॉटस्पॉट ! जिल्ह्यात वाढले आज 905 रुग्ण

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या 50 पेक्षा कमी झालेली असतानाच आज 57 रूग्ण आढळले तर पाच रूग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीणमध्ये टेस्टिंग कमी करूनही रूग्ण कमी झालेले नाहीत. आज आठ हजार 709 संशयितांमध्ये 848 रूग्ण आढळले असून 23 रूग्णांचा कोरोनाने (Covid-19) बळी घेतला आहे. शहरातील 23 आणि 24 या प्रभागात नेहमीच रूग्ण सर्वाधिक आढळले आहेत. बुधवारी (ता. 26) प्रभाग 23 मध्ये सर्वाधिक 14 तर प्रभाग 24 मध्ये आठ रूग्ण वाढले आहेत. (Two wards of the city are becoming hotspots and today 905 corona patients have been added to the district)

हेही वाचा: म्युकरमायकोसिसच्या 16 रुग्णांनाच "जनआरोग्य योजने'चा लाभ !

ग्रामीण भागातील पंढरपूर तालुक्‍यास दिलासादायक बाब म्हणजे दोन दिवसांत एकाही रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. आज पंढरपूर तालुक्‍यात 163, सांगोल्यात 57, करमाळ्यात 118, दक्षिण सोलापुरात 31 रूग्ण वाढले आहेत. तर अक्‍कलकोट तालुक्‍यात 45 , बार्शीत 112, माढ्यात 102 रूग्ण वाढले असून त्या ठिकाणी प्रत्येकी पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच माळशिरस तालुक्‍यात 133 रूग्ण वाढले असून तेथील तिघांचा तर मोहोळ तालुक्‍यात 42 व उत्तर सोलापूर तालुक्‍यात 16 रूग्ण वाढले आहेत. या दोन्ही तालुकयातील प्रत्येकी दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मंगळवेढ्यात 31 रूग्ण वाढले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत दहा लाख 62 हजार 88 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात एकूण एक लाख 19 हजार 761 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील एक लाख सहा हजार 908 रूग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा: बार्शीत आढळलेला म्युकरमायकोसिस बुरशीच्या दोन प्रजातींचा! तज्ज्ञांचे संशोधन

रुग्णांची सद्य:स्थिती

  • पॉझिटिव्ह रूग्ण : 1,47,782

  • मृत्यू : 3,856

  • बरे झालेले रूग्ण : 1,32,956

  • उपचार घेणारे रूग्ण : 10,970

जिल्ह्यातील 14 लाख संशयितांची टेस्ट

कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि सध्याच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत शहरातील तीन लाख 34 हजार 609 तर ग्रामीणमधील दहा लाख 62 हजार 88 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. आता ज्या गावात 25 पेक्षा अधिक रूग्ण आढळतात, त्या गावातील बहुतेक जणांची कोरोना चाचणी केली जाणार असून तसे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. आगामी काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग कमी होईल, असा विश्‍वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. मात्र, रूग्णसंख्येबरोबरच मृत्यूदर कमी करण्याचे प्रमुख आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.