
सांगोला : दुचाकी आणि बैलगाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका बैलासह दुचाकीवरील दोघेजण ठार झाल्याची घटना सांगोला येथील हॉटेल श्रीराम हॉटेलजवळ शनिवारी (ता. २२) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली आहे. अभिजित दादा भोसले व नंदकुमार चंद्रकांत चौधरी (दोघेही रा. पापरी, ता. मोहोळ) हे जागीच ठार झाले आहेत. बैलगाडी चालक जखमी झाला आहे.