
सोलापूर : केंद्र सरकारने संसदेत आणलेल्या वक्फ बिलाला उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराज झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपशहरप्रमुख ओंकार चव्हाण या पदाधिकाऱ्याने संतप्त होत, हुतात्मा चौकात गुरुवारी उद्धव ठाकरे यांचा फोटो फाडला अन् जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.