Solapur Drought: उजनी भरले तरी सोलापूरची चिंता कायम; ९५ पैकी ५३ महसूल मंडलांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

Solapur Faces Rainfall Deficit Despite Full Ujani Dam: उजनी धरण तुडुंब भरले तरी सोलापूरचा पाऊस तुटवडा गंभीर; ९५ पैकी ५३ महसूल मंडलांत जून ते २० सप्टेंबरदरम्यान ५० टक्क्यांपेक्षा कमी पावसामुळे खरिपाचे नुकसान, चारा व पिण्याच्या पाण्याची भीती
Ujani Dam Filled But Solapur Drought Concern Rises With 53 Of 95 Revenue Circles Recording Less Than Half Rainfall

Ujani Dam Filled But Solapur Drought Concern Rises With 53 Of 95 Revenue Circles Recording Less Than Half Rainfall

sakal

Updated on

सोलापूर : उजनी धरण भरले आहे, आता सोलापूर जिल्ह्याला काही चिंता नाही, असे म्हणणाऱ्यांचेही आता धाबे दणाणू लागले आहेत. जिल्ह्यातील ९५ महसूल मंडलांपैकी तब्बल ५३ मंडलांत जून ते २० सप्टेंबरदरम्यान ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पावसाअभावी खरिपाची राखरांगोळी झाली. आता जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या डोके वर काढू लागली आहे. परतीच्या पावसाचाही भरवसा कमी होऊ लागला आहे. प्रत्येकाच्या मुखात आता दुष्काळाची भाषा अन्‌ चेहऱ्यावर आगामी संकटाची चिंता दिसू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com