

Ujani Dam Update Inflow Falls Sharp Reduction in Bhima River Water Release Brings Relief to Riverbank Villages
sakal
सोलापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणारी पाण्याची आवक बुधवारी (ता. ५) दिवसभर घटत राहिली. त्यामुळे पूरनियंत्रणासाठी भीमा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही जलसंपदा विभागाने टप्प्याटप्प्याने कपात केली. सकाळी ६ वाजता धरणाच्या सांडव्यावरून १ लाख ११ हजार ६०० क्युसेक इतका एकूण विसर्ग सुरू होता. त्यानंतर सकाळी ७ वाजता तो १ लाख, सकाळी ११.३० वाजता ९० हजार, तर दुपारी ३ वाजता ६० हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. रात्री ८.३० वाजता वीजगृहाच्या १,६०० क्युसेकसह भीमा नदीपात्रातील एकूण विसर्ग ४१ हजार ६०० क्युसेक इतका होता.