Ujani Dam: निम्माही पाऊस नाही, तरी उजनी धरण फुल्ल! १६ दरवाजे उघडले, भीमेत ४० हजार क्युसेक विसर्ग

Ujani Dam at 98 Percent Despite Low Rainfall: निम्मा पाऊस, तरी उजनी शंभर टक्के भरतीच्या उंबरठ्यावर; पूरनियंत्रणासाठी १६ दरवाजे उघडून भीमेत वाढता विसर्ग, तर नियोजनाअभावी उन्हाळ्यात टंचाईची भीती
Maharashtra Rain Update Ujani Dam Almost Full 40000 Cusecs Released Through 16 Gates into Bhima River

Maharashtra Rain Update Ujani Dam Almost Full 40000 Cusecs Released Through 16 Gates into Bhima River

sakal

Updated on

सोलापूर : जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नसतानाही उजनी धरण गतवर्षाच्या तुलनेत तब्बल १३ दिवस आधी १०० टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर पोचले आहे. सोमवारी (ता. २७) रात्री ९ वाजता धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९८.५७ टक्क्यांवर पोचला असून, पूरनियंत्रणासाठी धरणाचे १६ दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात ३१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाणीसाठ्याची आनंददायी स्थिती असली तरी त्याचे वर्षभर काटेकोर नियोजन झाले नाही, तर उन्हाळ्यात पुन्हा पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com