
सोलापूर : मे महिन्यात दमदार हजेरी लावलेला पाऊस जून-जुलैमध्ये गायब झाल्याने उजनीतून कालव्याद्वारे पाणी सोडले जात आहे. सध्या उजनी धरण ९४.६५ टक्के भरले असून धरणात सध्या ११४ टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. दौंडवरून उजनीत येणारी आवक कमी झाल्याने भीमा नदीतून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे.