

Maharashtra Flood Update Ujani Dam Nearly Full Bhima River Flood Risk Grows In Pandharpur And Nearby Talukas
sakal
सोलापूर/पंढरपूर : स्थानिक पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक वाढल्याने धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग सोमवारी दुपारी वाढविण्यात आला. दुपारी २.३० पासून सांडव्यावरील विसर्ग ५१ हजारांवरून ७० हजार क्युसेक करण्यात आला. वीजनिर्मिती केंद्रातून १,६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने भीमा नदीतील एकूण विसर्ग ६१,६०० क्युसेक झाला आहे. या वाढीव विसर्गामुळे पंढरपूर, माळशिरस व मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांवरील पुराचे संकट कायम असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.