
सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण मंगळवारी (ता. २७) उपयुक्त पातळीत (प्लसमध्ये) आले आहे. २४ तासांत धरणात साडेचार टीएमसी पाणी आले असून सध्या धरणात दौंडवरून ३४ हजाराचा तर धरण परिसरातून ११ हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा प्लस चार टीएमसीवर जाईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.