Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Ujani Dam Loses 16 Point 42 Percent Storage Capacity Due to Silt: उजनी धरणातील गाळ साचल्याने साठवण क्षमतेत तब्बल १६.४२ टक्के घट; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर नुकसानामुळे सोलापूरसह परिसरातील पाणीपुरवठा व भविष्यातील जलव्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह
Ujani Dam Siltation Reduces Storage Capacity by 16 Point 42 Percent Central Water Commission Reports Huge Water Storage Loss

Ujani Dam Siltation Reduces Storage Capacity by 16 Point 42 Percent Central Water Commission Reports Huge Water Storage Loss

sakal

Updated on

-अप्पासाहेब हत्ताळे

सोलापूर : सोलापूरसह लगतच्या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या उजनी धरणाच्या साठवण क्षमतेला गाळाचा मोठा फटका बसला आहे. गाळ साचल्यामुळे उजनीच्या एकूण साठवण क्षमतेत तब्बल ५४५.०५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १६.४२ टक्के घट झाल्याचे केंद्रीय जल आयोगाच्या २०२३ मधील जलसर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, धरणाची मूळ एकूण क्षमता ३३२० दशलक्ष घनमीटर असताना आता ती २७७४.९५ दशलक्ष घनमीटर इतकीच राहिल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com