

Ujani Dam Has Ample Water But Farmers Remain Concerned As Return Monsoon Rain Could Impact Future Water Availability
sakal
-सचिन गुरव
सिद्धटेक: केवळ पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस पडल्यामुळे उजनी धरण आठ दिवसांतच शंभरीपार गेले. त्यानंतर आता धरण पूर्णपणे भरुन ९५ टक्क्यांवर स्थिरावले आहे. मात्र, धरणात मुबलक पाणीसाठा असला, तरी देखील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडेच लागलेले आहेत. कारण परतीच्या मान्सूनचा पुरेसा पाऊस न झाल्यास धरणातील पाणीसाठ्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.