
सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण सध्या ९४ टक्के भरले असून धरणात एकूण ११४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वर्षभराची जिल्ह्याची चिंता आताच दूर झाली आहे. सध्या दौंडवरून उजनीत २० हजार क्युसेकची आवक असल्याने धरणातून भीमा नदीत १५ हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला असून विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडले आहे.