
भीमानगर/टेंभुर्णी : उजनी धरण परिसरात होणारे नियोजित जल पर्यटन केंद्र रद्द करण्याच्या मागणीसाठी उजनी धरणात तब्बल चार तासांहून अधिक काळ धरणग्रस्त महिला व परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन उजनी जलाशयात उड्या मारून जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.